(संस्थापक अध्यक्ष : शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन तथा
नाथवंशज, श्रीक्षेत्र पैठण)
(संस्थापक अध्यक्ष : शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन तथा
नाथवंशज, श्रीक्षेत्र पैठण)
संत एकनाथ महाराज यांचे 'एकनाथी भागवत' हे मराठी भक्तिसाहित्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मौलिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ वारकरी संप्रदायाच्या धार्मिक परंपरेचे मूलाधार मानला जातो. संत एकनाथ महाराजांनी या ग्रंथाचे लेखन पैठण येथे सुरू करून काशी येथे पूर्ण केले. या ग्रंथात १८,७९८ ओव्यांचा समावेश असून, त्यात श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्यातील संवादाचे विवेचन केले आहे. हा ग्रंथ भक्तिपंथाच्या तत्त्वज्ञानाचे आणि साधनेचे विस्तृत विवेचन करणारा आहे.
हे एकनाथ महाराजांचे जलसमाधी स्थान आहे.
कृष्णकमलातीर्थावर नाथांनी आत्मा ब्रह्मांडात विलीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी तुळस आणि पिंपळाची रोपं उगवली. तेथेच नाथांचे पुत्र हरिपंडीत महाराजांच्या हस्ते पादुकांची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीतील मंदिराचा लाकडी गाभारा हा एकनाथांचे ११ वे वंशज श्रीमंतराजे श्री भानुदास महाराज गोसावी, जहागिरदार यांनी बांधला असून मुख्य तटबंदी ही अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे.
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org