Marathi / English

उत्सव
वेळापञक

४२३ वा श्री एकनाथषष्ठी महोत्सव, श्रीक्षेत्र पैठणषेत्र पैठण

Ranjan Pooja (The pot in which Bhagwan Shrikrishna has poured water) Time - 12.00 noon, Nath Mandir, Shrikeshtra,
Paithan

१} दिनांक 9/३/२०२३ -

रांजण पूजा (भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या वेषात ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण) वेळ दुपारी १ वाजता गावातील नाथ मंदिर, श्रीक्षेत्र पैठण

२} दिनांक १२/३/२०२३ -

अक्षत कार्यक्रम श्री विजयी पांडुरंगास अक्षत देऊन इतर मानकऱ्यांना श्री एकनाथषष्ठीचे निमंत्रण प्रस्थान - वेळ सायं ७ वाजता गावातील नाथ मंदिर येथुन

३} दिनांक १३/३/२०२३ -

श्री एकनाथषष्ठी महोत्सव - १) श्री विजयी पांडुरंगास महाभिषेक - पहाटे २ वाजता २) वारकरी पूजन श्री योगीराज महाराज गोसावी यांच्या निवासस्थानी- सकाळी ८ वाजता ३) सर्व कुलोत्पन्न नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी ( निर्याण दिंडी ) समस्त पारंपरिक मानकऱ्यांसह - गावातील नाथमंदिर येथून समाधीमंदिराकडे प्रस्थान दुपारी १ वाजता. तेथे वारकरी व नारदीय कीर्तन सेवा. ४) सायंकाळी समाराधना व महाप्रसाद ५) रात्री हरिकीर्तन ८ ते १०

४} दिनांक १४/३/२०२३

१) पुरस्कार वितरण समारंभ - संत एकनाथ महाराजांच्या नावाने विविध ६ पुरस्कारांचे वाटप - स्थळ - श्री संत नरहरी सोनार धर्मशाळा , नाथ गल्ली, पैठण २) हरिपाठ - सायंकाळी ४ वा ३) रात्री हरिकीर्तन ७ ते ९ ४) छबिना - श्री एकनाथसंस्थानाधिपती भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या वाड्यातील श्री एकनाथ महाराजांच्या पादुकांची मिरवणूक ! प्रस्थान- रात्री १ वाजता गावातील नाथमंदिर येथून. नगर प्रदक्षिणा करून गावातील नाथ मंदिरात दिनांक १५ / ३ / २०२३ रोजी आरतीने छबिन्याची समाप्ती.

५} दिनांक १५/३/२०२३ -

काला दिंडी - प्रस्थान- सायंकाळी ४;३० वाजता,गावातील नाथमंदिर येथून. सूर्यास्तासमयी परंपरेने समाधी मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी. अभंग व आरतीने उत्सवाची समाप्ती.

(टीप - वरील कार्यक्रम हे कुलोत्पन्न नाथवंशजांच्या अधिपत्याखाली होणार आहेत.)

संत श्री एकनाथ महाराज मिशनसाठी योगदान द्या

खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता

खाताधारकाचे नाव:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
चालू खात्याचा क्रमांक:
00000036694177969
बँकेचे नाव:
State Bank Of India
IFSC कोड:
SBIN0003796
शाखा:
Bhaji Market, Paithan
logoseperator

संपर्क माहिती :

शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,

द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६

callमोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५

emailईमेल : info@santeknath.org