Marathi / English

॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥

  • मुख्यपान(current)
  • चरिञ
    • पुर्वेतिहास
    • जीवनगाथा
    • कार्य
    • चमत्कार
  • वाङ्‍मय
    • नाथांचे वाङ्‍मय
      • वाङ्‍मयाविषयी
      • निवडक वाङ्‍मय
    • नाथांवरील वाङ्‍मय
      • अभंग
      • कविता
      • स्फुट
  • तत्वज्ञान
    • नाथांचे तत्वज्ञान
    • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
    • पी.एच.डी. धारक
  • गॅलरी
    • फोटो
      • एकनाथमहाराज
      • उत्सव
      • पैठण
      • कार्यक्रम
    • व्हिडीओ
    • संगीत
  • शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन
  • संपर्क
  • पुर्वेतिहास
  • उत्सव
    • श्री एकनाथषष्ठी
    • पालखी सोहळा
    • उत्सव वेळापञक
  • मंदिर
    • गावातील नाथमंदिर
    • समाधी मंदिर
    • नित्योपचार
  • परंपरा
    • गुरुपरंपरा
    • वंशपरंपरा
    • शिष्यपरंपरा
  • चमत्कार
  • अभ्यासकांच्या प्रतिक्रिया
  • पुस्तके
  • कविता
  • पैठण
  • संकेतस्थळाविषयी
  • आवाहन
  • कसे याल
  • प्रतिक्रिया
  • संकेतस्थळाचा नकाशा
  • चरित्र चित्रावली
वारकरी संप्रदाय - माहितीपट

जीवनगाथा

नाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी आश्वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. नाथांचे मातापिता नाथांच्या बालपणात निवर्तल्यामुळे आजी आजोबांनी नाथांचा सांभाळ केला. बालपणापासूनच नाथांना भगवद्‍भक्‍तीचे वेड. गुरुकृपेने भगवंताची भेट होते हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे जनार्दन स्वामी नावाचे दत्‍तभक्‍त किल्लेदार म्हणुन होते. नाथांनी त्यांना पाहताच सद्‍गुरू मानून मनोभावे सेवा केली. नाथांची सेवा पाहुन स्वामींनी त्यानां शिष्य म्हणुन स्वीकारले. स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्याच्या शिखरातील गुहेत दत्‍तध्यान करीत. एके दिवशी स्वामी ध्यानात असताना परकीयांचे आक्रमण झाले. सद्‍गुरुंची समाधी भंग होऊ नये म्हणुन नाथ हाती तलवार घेवून घोडयावर स्वार झाले. लढाई केली आणि शत्रुंचा पराभव केला. निस्सिम सेवेने नाथ दत्‍तात्रय दर्शनास पात्र झाल्याचे पाहुन शुलिभंजन पर्वतावर त्यांना पहिले दत्‍तदर्शन स्वामींनी घडविले. पुढे तीर्थयात्रा करुन नाथ पैठणास पोचले.

सद्‍गुरुंच्या आदेशाप्रमाणे पैठण येथेच वास्तव्य करुन नाथ गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले. नाथांची पत्नी गिरिजाबाई ह्या सुशील आणि तत्पर होत्या. त्यांना तीन अपत्ये झाली. गोदा, हरिपंडीत व गंगा. नाथांचा प्रपंच व परमार्थ हे दोन्हीही फुलू लागले. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांना कळावे या उद्देशाने त्यांनी ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली. त्यावरुन त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला. परंतु त्यास न जुमानता लोकोद्धारार्थ नाथांनी लोकांच्याच भाषेत भारुडादींच्या मार्गाने लोकांना परमार्थमार्गास लावले. लोकोद्धारासाठी वाङमयाच्या व आचरणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले.

देवाचे नाम घेण्याचा अधिकार स्त्री शूद्रादी सर्वांना आहे असे वारंवार सांगितले. अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे पैठणकरांनी अनेकप्रकारे नाथांना त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु नाथांनी त्यांचा कधीही तिरस्कार केला नाही. त्यांनी आपल्या आचरणाने शांती व भक्तीचा प्रचार केला.

त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. नाथांची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण ३६ वर्षे श्रीखंड्या, केशव व विठ्ठल नावाने नाथांघरी राबला. भगवान दत्तात्रयांनी नाथांच्या दारी द्वारपाल म्हणुन काम केले. नाथवाड्यात नित्य कीर्तन प्रवचनादी रोज होत असत.

नाथ सर्वसंतात श्रीमंत असल्याकारणाने येणाऱ्या प्रत्येकास रोज ओंजळभर साखर वाटत असत. साखरेच्या आशेनेतरी लोकांच्या कानी चार चांगले शब्द पडतील ही त्यामागची धारणा.

सर्वांना देवाकडे जावं वाटतं परंतु देवास नाथांकडे यावसं वाटलं. कर्नाटकातील एका सावकाराने बनविलेली श्रीविजयी पांडुरंगाची मूर्ती म्हणु लागली मला नाथांची सेवा हवी आहे. तो सावकार ती मूर्ती घेवून पैठणला आला. नाथांनी अनुभुती घेवून त्या मूर्तीचा स्वीकार केला. भावार्थ रामायण लिहिण्यासाठी प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांनी माझा पाठपुरावा केल्याचे नाथांनी लिहून ठेवले आहे.

एक दिवस नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले. लोक म्हणू लागले नाथ सर्वसामान्यांसारखेच गेले मग त्यांच्यात आणि आमच्यांत काय फरक? नाथ ताटीवर उठुन बसले म्हटले मी पुन्हा केव्हातरी जाईन. काही दिवसांनी फाल्गून वद्य षष्ठी शके (इ.स. १५३३ ते १५९९) हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांनी लक्ष्मीतीर्थावर शेवटचे कीर्तन केले. कृष्णकमलतीर्थामध्ये नाभिपर्यंत पाण्यात जावून आत्मा ब्रह्मांडात विलीन केला. त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडीतांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. त्यावरच नाथपुत्र हरिपंडीतांनी चरण पादुकांची स्थापना केली. प्रतिवर्षी एकनाथषष्ठी उत्सवास पाच ते सात लाख भाविक पैठणमध्ये येतात. आजही जे भाविक नाथांचे मनोभावे दर्शन घेतात त्यांना नाथ शांती, भक्ती आणि श्रीमंती प्रदान करतात. लग्न झालेल्या नवदाम्पत्याने एकदातरी नाथसमाधीचे दर्शन घ्यावे ही येथिल प्रथा आहे. नाथांसारखाच त्यांचा प्रपंच व परमार्थ सुखरुप होतो असा अनेकांचा अनुभव आहे.

कृष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उद्धरी जगाचे कलीदोष ॥ श्रीनिळोबा.

You can donate to the bank account given below

Name of Account Holder- Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan

Current Account No - 00000036694177969
Bank Name - State Bank Of India
IFSC Code - SBIN0003796
Branch - Bhaji Market, Paithan

Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Rights Reserved.
Designed & Developed By : Xposure infotech Pvt. Ltd.

Return and Refund
Privacy Policy
Cancellation Policy